दरोड्यातील तीन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:50+5:302021-09-03T04:21:50+5:30

नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात २९ ॲागस्ट रोजी मध्यरात्री नारायण एकनाथ गायकवाड (वय ५४) हे त्यांच्या कुटुंबासह घराचे पडवीमध्ये झोपले ...

Three accused in robbery arrested | दरोड्यातील तीन आरोपी जेरबंद

दरोड्यातील तीन आरोपी जेरबंद

नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात २९ ॲागस्ट रोजी मध्यरात्री नारायण एकनाथ गायकवाड (वय ५४) हे त्यांच्या कुटुंबासह घराचे पडवीमध्ये झोपले असताना अज्ञात सहा ते सहा चोरट्यांनी हातामध्ये काठ्या, तलवारी व भाले घेऊन गायकवाड व त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे भाऊ किसन एकनाथ गायकवाड, तसेच देवीदास जाधव आडभाई यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन दरवाजाच्या कड्या उघडण्यास भाग पाडून मारहाण करण्यात आली. तसेच घरातील मोबाईल, महिलांच्या अंगावरील दागिने, रोख रक्कम असा एकूण २ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेनेही या गुन्ह्याचा तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने नेवासा फाटा परिसरातून डांगर ऊर्फ प्रवीण छगन भोसले (रा. मुकिंदपूर झोपडपट्टी, नेवासा फाटा), सुदाम ऊर्फ शिवदास सुदमल भोसले (रा. गेवराई, ता. नेवासा), सुदाम ऊर्फ शिवदास सुदमल भोसले (रा. गेवराई, ता. नेवासा), पंकेश ऊर्फ पंक्या जगताप भोसले (रा. फत्तेपूर, ता. नेवासा) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांच्या इतर दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत.

--------

फोटो - ०२एलसीबी

नेवासा तालुक्यातील चांदा येथे शेतकऱ्यांना घातक शस्त्राने मारहाण करून दरोडा टाकणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

Web Title: Three accused in robbery arrested