थोरातचे विक्रमी ८ हजार ५१० मेट्रिक टन गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:47+5:302021-02-06T04:36:47+5:30
नवीन ५ हजार ५०० मेट्रिक टन व ३० मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पातून यावर्षी या हंगामात ७ लाख ३३ हजार ८७० ...

थोरातचे विक्रमी ८ हजार ५१० मेट्रिक टन गाळप
नवीन ५ हजार ५०० मेट्रिक टन व ३० मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पातून यावर्षी या हंगामात ७ लाख ३३ हजार ८७० मेट्रिक टनाचे गाळप झाले असून, ४० हजार लिटर प्रतिदिनी क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पातून आजअखेर एकूण ३९ लाख ५६ हजार ४०० लिटर अल्कोहोलचे उत्पादन केले आहे, तसेच अल्कोहलनिर्मितीतही एका दिवसात विक्रमी ६२ हजार १०० लिटरचे उत्पादन करून नुकताच या कारखान्याने उच्चांकही केला आहे. यंदाच्या हंगामात १०२ दिवसांत वीज प्रकल्पातून एकूण ६ कोटी ७२ लाख २० हजार युनिटचे वीज उत्पादन करून ३ कोटी ९९ लाख ९६ हजार युनिट इतकी वीज महावितरण कंपनीला विक्री करत २७ कोटी ६० लाख रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. या कारखान्याचे आतापर्यंत सरासरी ७ हजार १९४ मेट्रिक टनप्रमाणे उसाचे गाळप केले असून, १ टन ऊस जाळ्यापासून तयार होणाऱ्या भुशातून ८४. १३ युनिट वीज निर्मिती केली आहे.
कारखान्याच्या या यशस्वी कामगिरीत कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.