शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हा योगायोग, की...?; सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात विमानात शेजारी-शेजारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 13:25 IST

स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही शेजारी शेजारीच जागा मिळाली.

अहमदनगर : एकमेकांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी योगायोगाने दिल्लीला एकाच विमानाने प्रवास केला. यावेळी त्यांच्यात गप्पाही झाल्या. मात्र, चर्चेचा तपसील समजला नाही.शिर्डी येथून सकाळी १०.३० वाजता स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही शेजारी शेजारीच जागा मिळाली. अधिवेशनाची दोन दिवसांची सुट्टी संपल्यानंतर खासदार विखे पुन्हा दिल्लीला अधिवेशनासाठी निघाले होते. तर थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तेही वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीला निघाले होते. दरम्यान शेजारी-शेजारी बसलेल्या थोरात-विखे यांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. दोघांनीही विविध विषयांवर चर्चाही केल्याचे सांगण्यात येते. मात्र, ही नेमकी ही चर्चा काय झाली हे अद्याप समजू शकले नाही.दोघेही एकेकाळी काँगे्रसमध्ये होते़ विखे व थोरात यांचे मतदारसंघ शेजारी-शेजारी असल्यामुळे त्यांचे विविध मुद्यांवरुन नेहमी राजकीय वाद होते. राजकीय वर्चस्वावरुन दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दवडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील वाद राज्याला परिचित आहेत़ सुजय विखे यांनी थोरातांच्या संगमनेर मतदारसंघात कमळ फुलविण्याची घोषणा केली आहे. तर राधाकृष्ण विखे यांनीही जिल्ह्यात १२-० करण्याची जबाबदारीही सुजय यांच्यावर टाकली आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्षपदी थोरात यांचीच निवड झाल्यामुळे विखे - थोरात यांच्यातील वाद अधिक तीव्र होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विमानातील त्यांच्या या योगायोगाच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSujay Vikheसुजय विखेcongressकाँग्रेसBJPभाजपा