शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पासष्टवर्षीय आजीने केला चोरट्यांना प्रतिकार

By admin | Updated: January 15, 2016 23:29 IST

आश्वी : वरवंडी (ता. संगमनेर) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून साडेसहा तोळे सोन्यासह ५८ हजार रुपये घेऊन पोबारा केला. यात महिला मारहाणीत जखमी झाली आहे.

आश्वी : वरवंडी (ता. संगमनेर) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून साडेसहा तोळे सोन्यासह ५८ हजार रुपये घेऊन पोबारा केला. यात महिला मारहाणीत जखमी झाली आहे.गुरुवारी मध्यरात्री १ वाजता सुमारास रंगनाथ दादा गागरे यांच्या घराच्या पाठीमागील खिडकीचे गज तोडून दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश करत घरातील लोखंडी पेटी शेतात नेऊन त्यात असलेले रोख ४६ हजार रुपये काढून घेतले. शेजारील खोलीत झोपलेल्या इंदुबाई गागरे (वय ६५) हिच्या गळ्यातील दीड तोळ्याची पोत काढत सुनबाई कुठे आहे, याची विचारणा केली. यावेळी इंदुबाईने चोरट्यांना मिठी मारत आरडाओरड सुरू करताच तिच्या हातावर पहारीचा घाव घालत तिचा गळा स्वेटरने आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील इतर लोक जागे झाल्याने तेथून पळ काढत आपला मोर्चा मारूती जिजाबा गारगे यांच्या वस्तीवर वळविला. घराचे काम सुरू असल्याने घरातील छोट्या खोलीत झोपलेल्या लोकांना ओलांडून कपाटातील रोख रक्कम बारा हजार रुपये व पाच तोळे सोने घेऊन पलायन केले. चोरट्यांची चाहूल लागताच मारूती गागरे यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र काही अंतरावर पाच ते सहा हत्यारबंद टोळके दिसल्याने ते आरडाओरड करत मागे वळाले. गावात सुरू असलेल्या जागरण गोंधळाचा कार्यक्रमामुळे आरडाओरड कोणाच्याही कानावर जात नसल्याने त्यांनी भ्रमणदूरध्वनीद्वारे सुभाष वर्पे यांना कल्पना दिली असता, त्यांनी गावातील तरुणांच्या साह्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश आले नाही. १७ ते १९ वयोगटातील या तरुणांच्या हातात लोखंडी गज, काठ्या अशी हत्यारे होती.उपसरपंच सुभाष वर्पे यांनी आश्वी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्यानंतरही शुक्रवारी दुपारपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत शंका निर्माण होत असून, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. माहिती मिळताच संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजीत देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. ( प्रतिनिधी)