थर्टी फर्स्टच्या पार्टीत पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:21+5:302021-01-03T04:21:21+5:30
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल सुधीर क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल प्रकाश कोठारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...

थर्टी फर्स्टच्या पार्टीत पोलिसाला धक्काबुक्की
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल सुधीर क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल प्रकाश कोठारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्षीरसागर यांच्यासह काही पोलीस कर्मचारी ३१ डिसेंबरच्या रात्री तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, सावेडी येथील हॉटेल मातोश्रीमध्ये पोलीस हाॅटेलच्या परवान्याची चौकशी करण्यासाठी गेले. तेथे दारू पित असणाऱ्या दोघांना पोलिसांनी नावे विचारली असता, त्यातील आरोपी अमोल कोठारी (वय ४२, रा. बोरूडेमळा) याने तुम्हाला कशाला आमची नावे पाहिजेत, तुझी आणि तुझ्यासोबतच्या अधिकाऱ्याची वाट लावतो असे म्हणत कोठारीने क्षीरसागर यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेवून तोफखाना पोलीस ठाण्यात आणले व भादंवि कलम ३५३,१८६, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.