चोरट्यांकडून मंदिर पुन्हा ‘लक्ष्य’
By Admin | Updated: June 23, 2014 00:05 IST2014-06-22T23:17:32+5:302014-06-23T00:05:29+5:30
चांदीचा मुकुट लांबविला

चोरट्यांकडून मंदिर पुन्हा ‘लक्ष्य’
पारनेर : तालुक्यातील दुर्गम भागातील म्हसोबा झाप येथील कानिफनाथ मंदिरातील देवाच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट चोरीस गेला. शनिवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. या घटनेमुळे चोरट्यांनी पुन्हा मंदिरांना ‘लक्ष्य’ केल्याचे दिसून येते.
म्हसोबा झाप-भोरवाडी येथे हे मंदिर आहे. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला व देवाच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट लांबविला. याप्रकरणी भाऊशेठ हांडे, संदीप हांडे यांनी पारनेर पोलिसांकडे तक्रार करून चोरीचा तातडीने तपास करण्याची मागणी केली.
पारनेरचे पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
नगर-कल्याण महामार्गावरून हे गाव पंधरा ते वीस कि़मी अंतरावर असून चोरट्यांनी यापूर्वी याच रस्त्यावरील कर्जुले हर्या येथील हरेश्वर मंदिरात तीन वेळा चोरी केली होती.
(तालुका प्रतिनिधी)