बुरूडगाव कचरा डेपोला आता तिसरा दरवाजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:22+5:302021-09-25T04:21:22+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या बुरूडगाव येथील कचरा डेपोची संरक्षक भिंत तोडून तिसरा दरवाजा तयार करण्यात आला आहे. सात फूट उंचीची ...

बुरूडगाव कचरा डेपोला आता तिसरा दरवाजा
अहमदनगर : महापालिकेच्या बुरूडगाव येथील कचरा डेपोची संरक्षक भिंत तोडून तिसरा दरवाजा तयार करण्यात आला आहे. सात फूट उंचीची भिंत तोडून हा दरवाजा तयार केला जात असून, दोन दरवाजे असताना तिसरा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या बुरूडगाव येथे कचरा डेपो आहे. २० एकरवर कचरा डेपो उभारण्यात आला आहे. या कचरा डेपोमुळे परिसरात प्रदूषण होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाने कचरा डेपोभोवती सात फूट उंचीची क्राँक्रीटची भिंत उभारण्यात आली आहे. कचरा वाहतूक करणारी वाहने आत नेण्यासाठी व बाहेर सोडण्यासाठी, असे दोन दरवाजे आहेत. असे असताना शुक्रवारी तिसरा दरवाजा बसविण्यासाठी संरक्षक भिंत तोडण्यात आली आहे.
कचरा डेपोत अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. कचरा डेपोच्या प्रवेशद्वारापासून रस्ता क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा रस्ता पुढील २८ दिवस बंद ठेवावा लागणार आहे. पर्यायी रस्ता हवा असल्याने हा दरवाजा तयार करण्यात येत आहे; परंतु त्यासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घेणे गरजचे नव्हते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
.....
कचरा डेपोतील मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तात्पुरता नव्याने तिसरा दरवाजा तयार करण्यात आला आहे.
-यशवंत डांगे, उपायुक्त, महापालिका
...............
सूचना: फोटो २४ बुरूडगाव नावाने आहे.