हनीट्रॅपमधील तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:48+5:302021-07-21T04:15:48+5:30
शीतल किरण खर्डे व गणेश छगन गिऱ्हे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हनीट्रॅपची शिकार झालेल्या शेतकऱ्याने १८ जुलै ...

हनीट्रॅपमधील तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
शीतल किरण खर्डे व गणेश छगन गिऱ्हे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हनीट्रॅपची शिकार झालेल्या शेतकऱ्याने १८ जुलै रोजी फिर्याद दिल्यानंतर शीतल खर्डे आणि तिच्या साथीदारांचे हे कृत्य समाेर आले. फिर्यादी हा पाथर्डी तालुक्यातील रहिवासी आहे. शीतल खर्डे हिने फसवणुकीच्या उद्देशानेच त्याच्याशी ओळख वाढविली होती. १५ जून रोजी सायंकाळी फिर्यादीस शीतल हिने तिच्या वडगावगुप्ता येथील घरी बोलावून घेतले. तेथे त्याच्याशी जवळीक साधून फोटो काढले. घरात हे दोघे एकत्र असतानाच त्या वेळी एक तरुण तेथे आला. तो तरुण शीतल हिचा पती आहे आणि दोघांना एकत्र पकडले असे भासविण्यात आले. शीतल आणि तिच्या साथीदाराने फिर्यादीस मारहाण करून त्याच्याकडील ५ हजार रुपये हिसकावून घेतले. तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून गणेश गिऱ्हे याच्या मध्यस्थीने रोख दोन लाख रुपये उकळले. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतलेल्या तिसऱ्या आरोपीचा या गुन्ह्यात कसा सहभाग राहिला आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
---------------------
तक्रारदारांनी पुढे यावे
शीतल खर्डे आणि तिच्या साथीदारांनी अशाच पद्धतीने आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींकडून कुणाची आर्थिक फसवणूक झालेली असेल तर न घाबरता पुढे यावे, असे आवाहन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांनी केले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात पोलिसांनी शीतल हिच्या पतीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र शीतल ही पतीपासून वेगळी राहत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी सध्या तरी तिच्या पतीला अटक केलेली नाही.