भांबोरा परिसरात चोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:22 IST2021-05-20T04:22:31+5:302021-05-20T04:22:31+5:30

सिद्धटेक : भांबोरा (ता. कर्जत) परिसरामध्ये चोरांनी धुमाकूळ घातला आहे. भांबोरा (सिद्धटेकफाटा) येथील विठ्ठल कदम यांच्या घरी बुधवारी (दि.१२) ...

Thieves thrive in Bhambora area | भांबोरा परिसरात चोरांचा धुमाकूळ

भांबोरा परिसरात चोरांचा धुमाकूळ

सिद्धटेक : भांबोरा (ता. कर्जत) परिसरामध्ये चोरांनी धुमाकूळ घातला आहे.

भांबोरा (सिद्धटेकफाटा) येथील विठ्ठल कदम यांच्या घरी बुधवारी (दि.१२) सात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. घरासमोर झोपलेल्या विठ्ठल कदम यांना पिस्तूल, चाकूच्या साहाय्याने धमकावून दागिने, रोख रक्कम व मोबाइल घेऊन गेले. जाताना दरोडेखोरांनी कदम परिवारास घरामध्ये बंद केले. लगेच दुसऱ्या दिवशी दादासाहेब भगवान बळे यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. मंगळवारी गणेशवाडी येथे चोरी करण्याचा चोरांचा प्रयत्न फसला. तसेच सिद्धटेक येथील मोटारसायकल चोरून नेत असताना चोरास भांबोरा येथील युवकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मागील महिन्यापूर्वी भांबोरा येथील कल्याण जगताप यांची मोटारसायकल चोरीला गेली. दुधोडी-बेर्डी येथे विद्युत मोटारी चोरीच्या घटनेसह वरील कोणताच तपास लागला नाही. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. नागरिक रात्रीचे जागून पहारा देत आहेत. त्यातच एखादी अनोळखी व्यक्ती रात्री उशिरा दिसल्यास त्या व्यक्तीला संशयित म्हणून त्रास होत आहे. अशीच घटना सोमवारी सिद्धटेकफाटा येथे माहिजळगाव येथील युवकाच्या बाबतीत घडली.

--

ग्रामसुरक्षा दल ॲप..

मंगळवारी रात्री चोर आलेले समजताच भांबोरा गावातील युवक परमेश्वर लोंढे यांनी ॲपवरून फोन केला. त्यामुळे चोरांचा भांबोरा येथील चोरीचा प्रयत्न फसला.

----

भांबोरा येथील दरोड्याचा तपास सुरू आहे. भांबोरा-सिद्धटेक परिसरामध्ये रात्रीची पोलीस गस्त वाढवणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

-चंद्रशेखर यादव,

पोलीस निरीक्षक, कर्जत

Web Title: Thieves thrive in Bhambora area