सोनईत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:23+5:302021-06-10T04:15:23+5:30
नेवासा : तालुक्यातील सोनईत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरू आहे. मंगळवारी रात्री महावीर पेठेतील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी एका युवकास गंभीर ...

सोनईत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरूच
नेवासा : तालुक्यातील सोनईत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरू आहे. मंगळवारी रात्री महावीर पेठेतील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी एका युवकास गंभीर जखमी केले आहे. या घटनेनंतर सोनई व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनई येथील महावीर पेठेत उद्योजक विजय चांडक यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरटे घरात घुसणार एवढ्यात विजय चांडक यांचा मुलगा कृष्णा याला जाग आली. तो दरवाजाजवळ येताच चोरटे घराबाहेर पडले. एका चोरट्याचा हात धरला असता अन्य चोरट्यांनी कृष्णाच्या तोंडावर दगड फेकून मारला. यामध्ये त्याचे चार दात तुटून आठ टाके पडले आहेत. दोन्ही पायासही जखमा आहेत.
चांडक यास मारहाण होत असताना आवाज ऐकून पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गुगळे घराबाहेर आले. त्यांनी प्रसंगावधान ओळखून बंदुकीतून हवेत गोळीबार केला आणि चोरटे पळून गेले.
090621\img-20210609-wa0032.jpg
नेवासा तालुक्यातील सोनई येथील महावीर पेठेतील या घराचा दरवाजा चोरट्यांनी तोडला.