पीकअप चालकासह क्लिनरला मारहाण करुन चोरट्यांनी अडीच लाखाची रोकड पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 14:20 IST2020-06-24T14:19:39+5:302020-06-24T14:20:27+5:30
पुणतांबा येथील डेरा नाला पुलावर पीकअप चालकासह क्लिनरला अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन लुटले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची रोकड पळविली आहे. ही घटना २३ जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

पीकअप चालकासह क्लिनरला मारहाण करुन चोरट्यांनी अडीच लाखाची रोकड पळविली
पुणतांबा : येथील डेरा नाला पुलावर पीकअप चालकासह क्लिनरला अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन लुटले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची रोकड पळविली आहे. ही घटना २३ जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
विश्वनाथ नाना मोरे (रा.रामवाडी, मालेगाव) हा श्रीरामपूरला व्यापाºयाकडे माल खाली करून मालेगावकडे चालला होता. यावेळी पुणतांबा येथील रेल्वे गेटपासून दोन मोटारसायकलवर चौघांनी पाठलाग सुरू केला.
पुणतांबा गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या डेरा नाला पुलावर चौघांनी पीकअपला थांबवून तू पाठीमागे गाडीला धक्का मारून पळून जातो का? असे म्हणत मारहाणीस सुरवात केली.
एकाने पीकअप चालकास पकडून ठेवले. यानंतर तिघांनी क्लिनरलाही गाडीच्या खाली ओढून गाडीतील अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केले.
यातील एका संशयिताला पोलिसांनी पकडले असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान परिसरात गेल्या आठ दिवसापासून चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.