नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:32+5:302021-05-17T04:19:32+5:30
शनिवारी मध्यरात्री निंबोडी येथील भाऊसाहेब केरू भोगाडे यांच्या घरात तीन ते चार चोरट्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी भोगाडे यांनी ...

नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ
शनिवारी मध्यरात्री निंबोडी येथील भाऊसाहेब केरू भोगाडे यांच्या घरात तीन ते चार चोरट्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी भोगाडे यांनी चोरट्यांना प्रतिकार केला, तेव्हा त्यांनी तोंडावर दगड मारला. या घटनेत भोगडे यांचा एक दात पडला. त्यानंतर, चोरट्यांनी निंबोडी परिसरात राहणारे हौसाबाई जनार्दन गवळी यांच्या घरात घुसून त्यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले, तसेच गावातील संगीता खंडू साळुंखे यांच्या घरातून लोखंडी पेटी व दोन मोबाइल चोरून नेले. यावेळी चोरट्यांनी शेजारी राहणारे शिवाजी शहाजी बेरड यांच्या दिशेने दगडफेक केली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भाऊसाहेब भोगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी ससेवाडी येथे महादेव आसाराम पवार यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत, घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी महादेव पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधोर हे पुढील तपास करत आहेत.