त्यांनी ‘त्या’ घरी सुखी राहावे
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:44+5:302020-12-05T04:38:44+5:30
जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, सरचिटणीस भाऊसाहेब पुंजा वाकचौरे उपस्थित होते. ...

त्यांनी ‘त्या’ घरी सुखी राहावे
जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, सरचिटणीस भाऊसाहेब पुंजा वाकचौरे उपस्थित होते.
जुन्या-नव्या भाजप कार्यकर्त्यांचा मेळ साधत नवे ९ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ११ चिटणीस, कार्यालय प्रमुख, युवा मोर्चा, महिला आघाडी, आदिवासी सेल, कोअर कमिटी जाहीर केलाचा दावा करण्यात आला. प्रत्यक्ष कार्यकारिणीत बहुतांशी नव्याने भाजपत आलेले चेहेरे या जम्बो कार्यकारिणीत दिसत आहेत. या नाराजीचा फटका येत्या नगरपंचायत निवडणुकीत बसणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पिचड म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी हिताचे तीन विधेयके आणली असून, या कायद्यांमुळे शेतीमालास चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात ही गरज ओळखून सकारात्मक व नकारात्मक बाबींचा विचार करून मोदी सरकारने कायदे केले. यामुळे शेतीमालास योग्य भाव मिळेल. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना धोका नाही. तरीपण जनक्षोभ का वाढतोय? हा संशोधनाचा विषय आहे. आंदोलनात शेतकरी कमी आणि पुढारी जास्त दिसत आहेत. राज्य सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ समाधानकारक राहिला नाही. कोविड काळात तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून योग्य उपाययोजना झाल्या नाहीत.