औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:50 IST2018-07-24T12:49:05+5:302018-07-24T12:50:22+5:30
नगर - औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. प्रवरासंगम पुलापासून देवगड फाट्यापर्यंत वाहतूक ठप्प आहे.

औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरूच
अहमदनगर : नगर - औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. प्रवरासंगम पुलापासून देवगड फाट्यापर्यंत वाहतूक ठप्प आहे.
तारकपूर आगारातून औरंगाबादला जाणा-या बसेस रद्द केल्या आहेत. तर पुणे व इतर मार्गे येणा-या बसेस शेवगाव-पैठण, श्रीरामपूर-शिडीर्मार्गे औरंगाबादला वळवण्यात आल्या आहेत. बस, खासगी वाहनांनी औरंगाबादला जाणा-या प्रवाशांनी या किंवा इतर पयार्यी मार्गाचा वापर करावा. तसेच बसेस, खासगी चारचाकी वाहनांतून प्रवास करणा-यांनी रात्रभर पुरेल इतके पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ सोबत ठेवावेत. वाहनात इंधनही असावे. घाबरून जाण्याचे कारण नाही, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. काही अडचण आल्यास अहमदनगर पोलिस कंट्रोल रूमला ०२४१-२४१६१३२, नेवासे पोलिस स्टेशन : ०२४२७-२११२३३ किंवा १०० नंबर डायल करावा, असे आवाहन अहमदनगर जिल्हा पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.