पोलीस ठाण्याच्या आवारातच करे-सुखधान यांच्यात खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:23 IST2021-03-23T04:23:24+5:302021-03-23T04:23:24+5:30
नेवासा : नेवासा शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याबाबतचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने पोलीस निरीक्षक विजय करे व सामाजिक ...

पोलीस ठाण्याच्या आवारातच करे-सुखधान यांच्यात खडाजंगी
नेवासा : नेवासा शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याबाबतचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने पोलीस निरीक्षक विजय करे व सामाजिक कार्यकर्ते संजय सुखधान यांच्यात पोलीस ठाण्याच्या आवारातच खडाजंगी झाली. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला.
त्यानंतर सुखधान यांनी पत्रकार परिषद घेऊन करे यांच्यासह पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. याबाबत पोलीस ठाण्याच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सुखधान म्हणाले, नेवासा तालुक्यात वाळू, दारू, मटका, रेशन काळा बाजार, जुगार असे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आतापर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपास लागला नाही. गोमांस कत्तलचे प्रमाण व इतर गुन्हेगारी वाढली. या गुन्हेगारीस आळा बसण्याऐवजी पोलीस निरीक्षक करे यांच्या कार्यकाळामध्ये अवैध धंद्याचे प्रमाण वाढले आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी, असा प्रकार पोलीस ठाण्या घडत आहे, असा आरोपही सुखधान यांनी केला.
--
दहा ‘कलेक्टर’च्या नेमणुका
दहा प्रकारच्या अवैध व्यवसायांच्या वसुलीसाठी नेवासा पोलीस ठाण्याने दहा ‘कलेक्टर’च्या (पैसे गोळा करणारे) नेमणुका केल्या आहेत, असा आरोपही संजय सुखधान
यांनी केला.
--
संजय सुखधान यांनी निवेदनातून व सोशल मीडियावर केलेले आरोप खोटे आहेत. वेठीस धरण्यासाठी त्यांचं हे सगळ सुरू आहे. कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. आरोपात तथ्य आढळल्यास वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य असेल.
-विजय करे,
पोलीस निरीक्षक, नेवासा