गावागावांत कृषी परिसंवाद व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:20+5:302021-09-12T04:25:20+5:30

श्रीगोंदा / घारगाव : बदलते हवामान, पाण्याची समस्या, कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी ...

There should be agricultural seminars in villages | गावागावांत कृषी परिसंवाद व्हावेत

गावागावांत कृषी परिसंवाद व्हावेत

श्रीगोंदा / घारगाव : बदलते हवामान, पाण्याची समस्या, कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी परिसंवाद गावागावांत झाले पाहिजेत, अशी अपेक्षा आमदार नीलेश लंके यांनी व्यक्ती केली.

घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील प्रतीक कृषी सेवा केंद्र आयोजित ऊस, कांदा, लिंबोणी पीक परिसंवादाचे उद्घाटन लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा सीडस् फर्टिलायझर्स डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुनोत होते. कृषी तज्ज्ञ प्रशांत उंबरकर यांनी ऊस बेणे प्रक्रिया, लिंबू उत्पादन कशा पद्धतीने घ्यावे, जैविक खते व कीटकनाशके यांचा योग्य वापर कसा करावा आदींबाबत मार्गदर्शन केले.

रासायनिक खतांबरोबरच जैविक खतांचाही वापर केला पाहिजे, असे मत प्रशांत पोमने यांनी व्यक्त केले. या वेळी रघुनाथ शिंदे, रामदास झेंडे, बबनराव गाडेकर, प्रोटॉन संघटनेचे महासचिव शरद राऊत, विक्रम गदादे यांची भाषणे झाली.

या वेळी पृथ्वीराज नागवडे, कालिदास जगताप, डॉ. सचिन पानसरे, जिजाराम खामकर, डॉ. चंद्रशेखर कळमकर, आप्पासाहेब खामकर, दीपक साबळे, जालिंदर खामकर, शाहिदास थिटे, जालिंदर साबळे, संकेत खामकर, शंकर थिटे उपस्थित होते. प्रास्ताविक संयोजक मनीषा खामकर यांनी केले. संतोष खामकर यांनी आभार मानले.

Web Title: There should be agricultural seminars in villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.