गावाला कोणी वालीच नाही
By Admin | Updated: February 26, 2016 23:47 IST2016-02-26T23:25:17+5:302016-02-26T23:47:40+5:30
रियाज सय्यद, संगमनेर चार्ज सोपविलेले साहेब लेखी आॅर्डर मिळाल्याशिवाय गावात यायला तयार नाहीत, असे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये समोर आले.

गावाला कोणी वालीच नाही
रियाज सय्यद, संगमनेर
संगमनेर खुर्दचे कृषी सहायक आजारपणाच्या रजेवर, तर त्यांचा चार्ज सोपविलेले साहेब लेखी आॅर्डर मिळाल्याशिवाय गावात यायला तयार नाहीत, असे वास्तव संगमनेर खुर्द गावात ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये समोर आले.
संगमनेर खुर्द गावासाठी कृषी विभागाने बी.डी. काकड यांची कृषी सहायक म्हणून नेमणूक केली आहे. त्यांचे आठवड्यातील दिवस ठरलेले असूनही ते उपलब्ध होत नाहीत. गेल्या २-३ महिन्यांपासून काकड हे आजारपणाच्या रजेवर गेल्याने त्यांचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात चंदनापुरीचे कृषी सहायक पी. एस. राहिंज यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र कृषी मंडल अधिकारी अविनाश चंदन यांनी लेखी आदेश न देता तोंडी सांगितल्याने राहिंज गावात फिरकलेच नाहीत. त्यामुळे कुणाकडे दाद मागायची? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. दरम्यान राहिंज यांना फोन लावून विचारले असता शेतकऱ्यांची माहिती सांगता येणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले. तर कृषी मंडलाधिकारी चंदन यांनी एवढ्यात संगमनेर खुर्दला भेट दिली नसल्याचे सांगून गरजेच्या वेळी जातो, असे सांगितले.