‘आपले सरकार’वर आपली बँकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 15:02 IST2017-08-11T14:58:43+5:302017-08-11T15:02:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बेलापूर: श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव व एकलहरे येथील शेतकºयांचे व्यवहार तेथील सेवा सहकारी संस्थेत आहेत. या संस्था ...

There is no bank on 'your government' | ‘आपले सरकार’वर आपली बँकच नाही

‘आपले सरकार’वर आपली बँकच नाही

ठळक मुद्देश्रीरामपूर तालुक्याला बावीस पॉझ मशिनची आवश्यकता असून पाच मशिन सेवा केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.आणखी मशिन उपलब्ध झाल्या तरच सेवा केंद्रांवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.सरकारच्या तांत्रिक चुकांमुळे शेतक-यांना आपला उद्योग सोडून संग्राम केंद्र, सेवा केंद्रांकडे चकरा मारण्याचे काम करावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
बेलापूर: श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव व एकलहरे येथील शेतकºयांचे व्यवहार तेथील सेवा सहकारी संस्थेत आहेत. या संस्था जिल्हा बँकेच्या उक्कलगाव शाखेशी संलग्न आहेत. पण बँकेच्या शाखेचे नावच आपले सरकार पोर्टलवर नसल्याने दोन्ही गावांमधील शेतकºयांना कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरता येत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपले अर्ज आॅफलाईन भरले आहेत.
या दोन्ही ठिकाणच्या शेतकºयांनी आपली कैफियत सेवा संस्थेच्या पदाधिकाºयांकडे मांडली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी एकलहरे सेवा संस्थेचे अध्यक्ष लालमहंमद जहागीरदार व उपाध्यक्ष शहनाज इकबाल शेख यांनी जिल्हा परिषद सदस्या आशा दिघे यांची भेट घेऊन शेतकºयांच्या समस्या सांगितल्या. त्यांनी संबंधित अधिकाºयांना याविषयी माहिती देऊन यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन यातून लवकरच मार्ग काढला जाईल, असे सांगितले. अनेक दिवसांपासून कर्जमाफीसाठी लढा दिल्यानंतर आता सरकारच्या तांत्रिक चुकांमुळे शेतकºयांना आपला उद्योग सोडून संग्राम केंद्र, सेवा केंद्रांकडे चकरा मारण्याचे काम करावे लागत आहे. आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
सध्या श्रीरामपूर तालुक्याला बावीस पॉझ मशिनची आवश्यकता असून पाच मशिन सेवा केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आणखी मशिन उपलब्ध झाल्या तरच सेवा केंद्रांवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

Web Title: There is no bank on 'your government'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.