मग चंद्रकांत पाटील पुण्यात कसे?-सुप्रिया सुळे; राष्ट्रवादीची कर्जतला प्रचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 13:03 IST2019-10-18T13:02:24+5:302019-10-18T13:03:18+5:30
रोहित पवारला पार्सल म्हणता, मग पुण्यात उमेदवारी करणारे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पार्सल नाहीत का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना विचारला.

मग चंद्रकांत पाटील पुण्यात कसे?-सुप्रिया सुळे; राष्ट्रवादीची कर्जतला प्रचार सभा
कर्जत : रोहित पवारला पार्सल म्हणता, मग पुण्यात उमेदवारी करणारे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पार्सल नाहीत का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना विचारला.
कर्जत येथे गुरुवारी राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सध्या येथे रोहित पवार यांच्या उमेदवारीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाहेरचे पार्सल बाहेर पाठविण्याची भाषा केली जात आहे. मग भाजपने कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना पुण्यात उमेदवारी दिली. ते नाहीत का मग पार्सल? अशी टीका त्यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, पार्थ पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालीम संघाचे अध्यक्ष प्रवीण घुले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे , पंचायत समिती सदस्य महेंद्र गुंड आदी उपस्थित होते.