तीन लाखांच्या डाळिंबाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:14 IST2019-09-06T15:13:15+5:302019-09-06T15:14:19+5:30
साकूर येथील एका शेतक-याच्या डाळिंब बागेतून सुमारे तीन लाख रुपये किमतीची २०० कॅरेट डाळिंब फळे चोरीस गेल्याने पठारभागातील सर्वच डाळिंब उत्पादक शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे.

तीन लाखांच्या डाळिंबाची चोरी
घारगाव : ग्रामीण भागात घरफोड्या, वाहन चोरी प्रकाराबरोबरच आता फळ पिकांच्या चोºयांचे प्रमाणही वाढले आहे. साकूर येथील एका शेतकºयाच्या डाळिंब बागेतून सुमारे तीन लाख रुपये किमतीची २०० कॅरेट डाळिंब फळे चोरीस गेल्याने पठारभागातील सर्वच डाळिंब उत्पादक शेतक-यांमध्ये घबराट पसरली आहे.
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील शेतकरी राजेंद्र भिमाजी कोल्हाळ यांची दीड एकरात डाळिंबाची बाग असून बागेत चांगल्या प्रकारची फळे आली आहेत. फळे विक्रीस आली असताना अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री ते रविवारी दुपारच्या दरम्यान बागेत प्रवेश करून डाळिंबाचे सुमारे २०० कॅरेट चोरी केले. या अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयाचे डाळिंब चोरल्याचे राजेंद्र कोल्हाळ यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश टकले हे करीत आहेत.