मोबाईल दुकान फोडले; अडीच लाखांचा माल पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 17:44 IST2021-02-14T17:42:52+5:302021-02-14T17:44:32+5:30
श्रीरामपूर शहरातील नेवासे रस्त्यावर बसस्थानकानजीक असलेल्या मोबाईलच्या दुकानाचे कुलूप तोडून सात ते आठ लाख रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी पळविले. गल्ल्यातील अडीच लाख रुपयांची रोकडही लुटली.

मोबाईल दुकान फोडले; अडीच लाखांचा माल पळविला
श्रीरामपूर : शहरातील नेवासे रस्त्यावर बसस्थानकानजीक असलेल्या मोबाईलच्या दुकानाचे कुलूप तोडून सात ते आठ लाख रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी पळविले. गल्ल्यातील अडीच लाख रुपयांची रोकडही लुटली.
व्यावसायीक जितेंद्र रुपचंद कासलीवाल यांचे हे दुकान आहे. शनिवारी रात्री हा ही चोरीची घडना घडली. दुकानाचे कुलूप तोडून आत एका चोराने प्रवेश करत ही लूट केली. बाहेर तीन ते चार चोरटे उभे होते.
चोरट्यांनी तोंड झाकलेले होते. यातील एकाने तोंडात ब’टरी धरून उजेडात पिशवीमध्ये मोबाईल भरले. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला.