अमरधाममध्ये अंत्यविधी अन् घरात चोरी; श्रीगोंदा शहरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:02 IST2019-10-18T16:01:55+5:302019-10-18T16:02:54+5:30

श्रीगोंदा येथील येथील वृत्तपत्र विक्रेते दत्तात्रय शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई विठोबा शिंदे यांचे निधन झाले. शुक्रवारी पहाटे अंत्यविधी चालू असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातून दहा तोळे सोने व ५० हजाराची रोकड असा ३ लाख ५० हजाराचा माल लंपास केला.

Theft at the funeral home and at Amar Dham; Events in Shrigonda City | अमरधाममध्ये अंत्यविधी अन् घरात चोरी; श्रीगोंदा शहरातील घटना

अमरधाममध्ये अंत्यविधी अन् घरात चोरी; श्रीगोंदा शहरातील घटना

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील येथील वृत्तपत्र विक्रेते दत्तात्रय शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई विठोबा शिंदे यांचे निधन झाले. शुक्रवारी पहाटे अंत्यविधी चालू असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातून दहा तोळे सोने व ५० हजाराची रोकड असा ३ लाख ५० हजाराचा माल लंपास केला. 
शिंदे कुंटुबाला या घटनेमुळे दुहेरी संकटाचा सामन्यास सामारे जावे लागले आहे. शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळास भेट दिली. श्वानपथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीबाई शिंदे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी रात्री एक वाजता निधन झाले. शिंदे परिवार दुखा:त असताना रात्री तीन वाजता लक्ष्मीबाई यांच्यावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार सुरू होते. ही संधी साधून चोरट्यांनी शिंदे यांच्या वाड्याचे कुलूप तोडले.  घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करून दहा तोळे सोने व ५० हजार रोकड लंपास केली. या घटनेने श्रीगोंदा शहर परिसरात खळबळ उडाली आहे. 

Web Title: Theft at the funeral home and at Amar Dham; Events in Shrigonda City