चोरीचा प्रयत्न फसला; चोरट्यांकडून सराफाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 13:09 IST2017-10-18T13:06:10+5:302017-10-18T13:09:12+5:30

शेवगाव : शहरातील गजबजलेल्या भारदे गल्ली येथे राहणा-या प्रकाश मधुकर शहाणे या सराफ व्यावसायिकाच्या घरात शिरून त्यांना फायटरने मारहाण ...

Theft attempt failed; Goldfish smugglers from thieves | चोरीचा प्रयत्न फसला; चोरट्यांकडून सराफाला मारहाण

चोरीचा प्रयत्न फसला; चोरट्यांकडून सराफाला मारहाण

शेवगाव : शहरातील गजबजलेल्या भारदे गल्ली येथे राहणा-या प्रकाश मधुकर शहाणे या सराफ व्यावसायिकाच्या घरात शिरून त्यांना फायटरने मारहाण करून चोरी केल्याची घटना बुधवारी पहाटे तीन वाजता घडली.
शहाणे यांची मेन रोडवर सराफ पेढी असून मंगळवारी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले होते. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरात मोठा ऐवज मिळेल, अशा हेतूने अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूने घरात प्रवेश केला. यावेळी सावध झालेल्या प्रकाश व त्यांचे भाऊ प्रशांत यांची चोरट्यांशी झटापट झाली. त्यावेळी शहाणे यांनी शेजा-यांना हाक मारली. चोरट्यांनी प्रकाश यांच्या मानेवर फायटरने वार केले. शेजारी आल्याचे पाहताच चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.

Web Title: Theft attempt failed; Goldfish smugglers from thieves