इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:03 IST2024-11-30T12:03:05+5:302024-11-30T12:03:30+5:30

गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल, असा ठराव घेण्यात आला.

The Gram Panchayat in Maharashtra made a unique resolution | इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!

इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!

भेंडा: सौंदाळा (ता. नेवासा) गावात शिवीगाळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा ठराव ग्रामसभेने घेतला आहे. तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिली. यासाठी पाचशे रूपयांचा दंड आकारला जाणार आहे. सौंदाळा येथे गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल. आई व बहिणीचा कुठलाही दोष नसताना शिवीगाळ करून अर्वाच्च शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो, यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आई, बहिणी, मुलीला आठवले पाहिजे. शिव्या देण्यावर बंदी घालून महिलांचा सौंदाळा गावाने सन्मान केला आहे. ठराव सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली. अनुमोदन गणेश आरगडे यांनी दिले. 

सोशल मीडिया, मोबाइलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल द्यायचा नाही, असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला, यावेळी ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे, उपसरपंच कोमल आरगडे, सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज आढागळे, सुधीर आरगडे, बाळासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, मंजू आढागळे, माजी सरपंच प्रियंका आरगडे, उषा बोधक, मंगल बोधक, रंजना बोधक, अश्विनी आडागळे, कावेरी आढागळे यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.

बालकामगार बंदीचाही ठराव

ग्रामसभेत बालकामगार बंदीचा ही ठराव घेण्यात आला. बालकामगार मुक्त गाय करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा असे घोषवाक्य केले आहे. बालकामगार निदर्शनास आल्यास, त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा, त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस देण्याचा निर्णय झाला. गावात बालविवाह शंभर टक्के बंद करण्यात आलेले आहेत. गावात कुणीही बालविवाह करू नये. तसे केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही ठराव झाला.
 

Web Title: The Gram Panchayat in Maharashtra made a unique resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.