नगरच्या उड्डाणपुलाचे दिवाळीच्या दिवशी होणार लोकार्पण; सुजय विखे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 11:02 IST2022-06-06T11:02:41+5:302022-06-06T11:02:41+5:30

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मार्केट यार्ड येथील पुलाच्या पिलरवर शिवाजी महाराज यांचे चरित्र  रेखाटले जाणार आहे.

The Ahmednagar city's flyover will be inaugurated on Diwali; Information of MP Sujay Vikhe | नगरच्या उड्डाणपुलाचे दिवाळीच्या दिवशी होणार लोकार्पण; सुजय विखे यांची माहिती

नगरच्या उड्डाणपुलाचे दिवाळीच्या दिवशी होणार लोकार्पण; सुजय विखे यांची माहिती

अहमदनगर: अहमदनगर येथील उड्डाणपुलाचे दिवाळीच्या दिवशी लोकार्पण होईल, अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मार्केट यार्ड येथील पुलाच्या पिलरवर शिवाजी महाराज यांचे चरित्र  रेखाटले जाणार आहे. पुण्याचे चित्रकार निखिल इनामदार हे चित्र रेखाटणार आहेत. सध्या ३० पिलरवर हे चित्र रेखाटले जाणार आहेत. ही चित्रे उजेडात राहणार आहेत. तसेच चित्रांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. सर्वात जलद गतीने पूर्ण होणारा हा उड्डाणपुल असेल. त्यासाठी गिनिज बुककडेही नोंदणी केलेली आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे नाव काय असावे हे जनता ठरवेल. नामांतर केल्याने दुष्काळ मिटणार आहे का? लोकांचे प्रश्न मिटणार आहे का? असा सवाल उपस्थित करत भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांची मागणी वैयक्तिक असल्याचे विखे यांनी सांगितले. राज्यातले सरकार अस्थिर आहे. महाविकास आघाडीतील सरकारमधील पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे राज्यात स्थिर सरकारची गरज आहे, असेही विखे म्हणाले.

Web Title: The Ahmednagar city's flyover will be inaugurated on Diwali; Information of MP Sujay Vikhe