धन्यवाद मोदींजी जाहिरात फलक हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:54+5:302021-07-28T04:22:54+5:30

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले मोफत लसीकरण अभियानाची जाहिरात करणारे फलक महापालिकेने मंगळवारी हटविले. लसीकरणाबाबत ‘धन्यवाद ...

Thank you Modi for removing the billboard | धन्यवाद मोदींजी जाहिरात फलक हटविले

धन्यवाद मोदींजी जाहिरात फलक हटविले

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले मोफत लसीकरण अभियानाची जाहिरात करणारे फलक महापालिकेने मंगळवारी हटविले. लसीकरणाबाबत ‘धन्यवाद मोदीजी’ हे शहरातील फलक हटविल्याने पालिकेला चक्क दिल्लीतून विचारणा झाल्याचे वृत्त आहे.

महापालिकेच्या लसीकरण केंद्राबाहेर दोन दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने मोठे फलक लावण्यात आले होते. या फलकावर वरच्या बाजूला स्व. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंढे आणि बाळासाहेब विखे यांचे पासपोर्ट साईज फोटो आहेत. फलकाच्या दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फाेटो आहे. फलकावर मध्यभागी ‘सर्वांना मोफत लस’ असे ठळक अक्षरात लिहिलेले आहे. त्याखाली ‘जगातील सर्वांत मोठे मोफत लसीकरण अभियान’ असा मजकूर आहे. पंतप्रधानांच्या फोटोखाली ‘धन्यवाद मोदीजी’ असे पांढऱ्या अक्षरात लिहिलेले असून, भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी फलकाच्या माध्यमातून केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत. मोफत लसीकरणाची जाहिरात करणाऱ्या फलकांबाबत पालिकेला तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी नागापूर, भोसले आखाडा, मुकुंदनगर येथील लसीकरण केंद्राबाहेर लावलेले फलक हटविले. या कारवाईवरून भाजपच्या नेत्यांनी फोन करून पालिकेला जाब विचारला. त्यामुळे भाजपचे फलक हटविण्याची मोहीम थांबविण्यात आल्याचे समजते.

....

भाजपची विनापरवाना जाहिरातबाजी

शहरात सुरू असलेल्या कोरोनावरील लसीकरणाची भाजपकडून जाहिरात केली जात आहे. भाजपने ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘धन्यवाद मोदीजी’ अशा आशयाचे फलक लावले आहेत. परंतु, त्यासाठी रीतसर परवानगी घेतली न गेल्याने भाजपला कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

...

शहरात कोरोनावरील लसीकरणाबाबत भाजपने फलक लावलेले आहेत. फलकांना पालिकेची परवानगी नसल्याने ते हटविण्यात आले असून, संबंधितांना परवानगी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.

- शंकर गोरे, आयुक्त, महापालिका

Web Title: Thank you Modi for removing the billboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.