संशयित कोरोनाबाधित रुग्णांच्या स्त्रावाची तपासणी आता तालुकापातळीवरच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 13:08 IST2020-04-13T13:08:15+5:302020-04-13T13:08:25+5:30
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह २६ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकही सापडलेला नाही, ही समाधानाची बाब आहे. तिसºया स्टेजमधील धोका लक्षात घेता आता तालुक्यातील रुग्णांच्या घशातील स्त्रावांची तपासणी आता तालुकास्तरावरच केली जाणार आहे. तेथूनच हे नमुने थेट पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. त्यामुळे त्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविणे आणि तेथे होम क्वारंटाईन करणे यामध्ये जास्त वेळ जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे हे रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने थेट पुण्यात पाठविले जाणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी रोहिणी नºहे यांनी दिली.

संशयित कोरोनाबाधित रुग्णांच्या स्त्रावाची तपासणी आता तालुकापातळीवरच होणार
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह २६ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकही सापडलेला नाही, ही समाधानाची बाब आहे. तिसºया स्टेजमधील धोका लक्षात घेता आता तालुक्यातील रुग्णांच्या घशातील स्त्रावांची तपासणी आता तालुकास्तरावरच केली जाणार आहे. तेथूनच हे नमुने थेट पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. त्यामुळे त्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविणे आणि तेथे होम क्वारंटाईन करणे यामध्ये जास्त वेळ जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे हे रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने थेट पुण्यात पाठविले जाणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी रोहिणी नºहे यांनी दिली.
नºहे यांनी सोमवारी स्वामी विवेकानंद मेडिकल कॉलेजला भेट दिली. तिथे ४१५ रुग्णांवर उपचार करता येतील, अशा व्यवस्थेची पाहणी केली.
तालुका पातळीवर वैद्यकीय सेवेसाठी कोरोना पॉझिंटीव्ह व निगेटिव्ह व इतर संशयीत रुग्ण या प्रमाणे वर्गवारी करून त्यांना रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात येईल. त्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय व महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे मुलींचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर मुले मुलींचे वसतीगृह ताब्यात घेण्यात येणार आहे, असे तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले.
श्रीगोंदा तालुका प्रशासनाने अतिशय उत्तम कामगिरी केली आहे त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाची एंन्टी झालेली नाही परंतू आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सुचनेनुसार रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट आहे असेही नºहे यांनी स्पष्ट केले.
यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत काळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर,नायब तहसीलदार डॉ.योगिता ढोले,डॉ महेश हिरडे डॉ भाऊसाहेब हिरडे आदी उपस्थित होते.