वाळू उपशावरुन तणाव

By Admin | Updated: May 6, 2016 23:26 IST2016-05-06T23:15:01+5:302016-05-06T23:26:39+5:30

मांजरी : शुक्रवारी सकाळी प्रवरा नदी पात्रात वाळू भरण्यासाठी आलेला ट्रक कोपरे ग्रामस्थांनी अडवून एक कणही वाळू भरू दिली जाणार नाही, असा इशारा दिला़

Tension from Sand Saline | वाळू उपशावरुन तणाव

वाळू उपशावरुन तणाव

मांजरी : शुक्रवारी सकाळी प्रवरा नदी पात्रात वाळू भरण्यासाठी आलेला ट्रक कोपरे ग्रामस्थांनी अडवून एक कणही वाळू भरू दिली जाणार नाही, असा इशारा दिला़ त्यामुळे कोपरे ग्रामस्थ व वाळू ठेकेदारांमध्ये शाब्दिक चकमक झडली़ यातून तणाव निर्माण झाला़
वाळूचा ट्रक नदीपात्रात आल्याची वार्ता पसरताच मांजरी, कोपरे, तिळापूर, शेणवडगाव, वांगी, तिळापूर, वांजुळपोई येथील गावकरी नदीपात्रात जमा झाले़ एम. एच. ७५६ हा संगमनेर येथील माउली कन्स्ट्रक्शनच्या ट्रक भोवती गर्दी केली़ सरपंच तुषार जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रल्हाद जगताप, उपसरपंच लक्ष्मण जगताप, कोपरे सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव जगताप, व्हाईस चेअरमन सखाराम जगताप, एकनाथ ठोसर, नानासाहेब पवार, शहाजी विटनोर, सुनील बाचकर, मंगेश बाचकर, अमोल जाटे, गोरख विटनोर आदी घटनास्थळी जमा झाले़ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याशी गावकऱ्यांनी संपर्क साधला़ शांततेचे आवाहन पाटील यांनी गावकऱ्यांना केले़ दुपारी तीन वाजेपर्यंत ठेकेदाराचे चाळीस माणसं मुळा नदीपात्रात होते़ त्यानंतर सर्वजण ट्रक सोडून गेले़
(तालुका प्रतिनिधी)
वाळू उचलू न देण्याचा ठराव पाच गावामध्ये पारीत झाला आहे़ २०१३ मध्ये नदीपात्रातून वाळू उचलण्यात आली होती़ यापुढील काळात वाळू उचलू दिली जाणार नाही़ वाळू उचलल्यास नदीकाठ ओसाड होईल़ त्यामुळे भविष्यकाळात गावकरी एकी दाखवून वाळूचा एक कणही उचलू देणार नाहीत़
-तुषार जगताप,
सरपंच कोपरे
कांतिलाल बोकडीया यांच्या नावावर वाळू उचलण्याचे टेंंडर एक कोटी रुपयाला घेतले आहे़ गावकऱ्यांची याचिका हायकोर्टात रद्द करण्यात आलेली आहे़ रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता तयार करण्यासाठी आलो असता गावकऱ्यांनी मज्जाव केला़ वाळू उचलण्याचे परमीट असून कायदेशीर वाळू उपसा केला जाईल़-प्रवीण फरगडे, ठेकेदार

Web Title: Tension from Sand Saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.