शहरं
Join us  
Trending Stories
1
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
2
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
3
Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
4
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
5
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
6
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
7
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
8
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
9
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
10
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
11
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
12
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
13
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
14
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
16
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
17
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
18
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
19
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
20
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनी फार्मसीचे दहा विद्यार्थी नाईपर - जेईई परीक्षेेत यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

कोपरगाव : नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फार्मास्यिुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेने बी. फार्मसीनंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी ...

कोपरगाव : नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फार्मास्यिुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेने बी. फार्मसीनंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी घेतलेल्या नाईपर - जेईई २०२१ या प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यात संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचे १० विद्यार्थी ऑल इंडिया रॅन्कमध्ये चमकले असून, महेश परसराम जावळे याने संपूर्ण भारतातून ५८वा रॅन्क मिळविला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.

कोल्हे म्हणाले, नाईपर - जेईई प्रवेश पात्रता परीक्षेसाठी ३ जुलै, २०२१ला घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत देशातून ४,८०० विद्यार्थ्यांनी आपले नशीब आजमावले. यामध्ये संजीवनीचे १० विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. महेश जावळे, पवन कलन, सुरेश शिंदे, चेतन जानराव, शुभम कावरे, शैलेश मतसागर, वैभव लासुरे, क्रिष्णा धोर्डे, जय गागरे आणि कार्तिकी वानखेडकर या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फार्मास्यिुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे भारतात ८ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये नाईपर - जेईई प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग राउंडद्वारे एम. एस. (फार्मसी), एमबीए (फार्मसी), एम. टेक (फार्मसी) व एम. फार्मसी अशा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. याचबरोबर प्रत्येकी १२,४०० प्रति महिना इतके स्टायपेंडही त्यांना मिळणार आहे.