टेम्पोची ट्रकला भीषण धडक; १७ वासरांचा जागीच मृत्यू
By Admin | Updated: April 4, 2016 00:10 IST2016-04-04T00:10:51+5:302016-04-04T00:10:55+5:30
मिरजगाव : कत्तलखान्याकडे चाललेल्या वासरांच्या टेम्पोला ट्रकची धडक बसून १७ वासरांचा जागीच मृत्यू झाला. ३५ वासरे अत्यावस्थेत आहेत.

टेम्पोची ट्रकला भीषण धडक; १७ वासरांचा जागीच मृत्यू
मिरजगाव : कत्तलखान्याकडे चाललेल्या वासरांच्या टेम्पोला ट्रकची धडक बसून १७ वासरांचा जागीच मृत्यू झाला. ३५ वासरे अत्यावस्थेत आहेत. नगर-सोलापूर महामार्गावर जोतिबावाडी शिवारात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला.
नगरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या टेम्पोला सिमेंटने भरलेल्या ट्रकने मागील बाजूने धडक दिल्याने टेम्पोच्या मागील भागाचा चुराडा झाला व पन्नास ते पंचावन्न वासरे महामार्गावर विखुरली. अपघातानंतर टेम्पोचालक भरधाव वेगाने हा टेम्पो दोन-तीन किलोमीटर अंधारात रस्त्याच्या बाजूला सोडून पळून गेला. या अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव दूरक्षेत्राचे पो. हे. कॉ. सुरेश बाबर, दत्ता कासार, हृदय घोडके, साबळे यांनी काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.
अपघात इतका भीषण होता की, सर्व वासरे रस्त्यावर विखुरली होती. काही वासरे मृतावस्थेत होती तर अनेक गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत होती.
पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला नगरला हलविण्यात आले. कोकणगावचे पोलीस पाटील प्रशांत गवारे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास पो. हे. कॉ. सुरेश बाबर करीत आहेत.
(वार्ताहर)