खरवंडी कासारनजीक टेम्पो उलटला; २६ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 11:11 IST2020-05-12T11:11:30+5:302020-05-12T11:11:57+5:30

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात तब्बल २६ मजूर जखमी झाले आहेत. त्यामध्ये लहान मुले, महिला व पुरुषांचा समावेश आहे. एका बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

The tempo reversed near Kharwandi Kasar; 26 workers injured | खरवंडी कासारनजीक टेम्पो उलटला; २६ मजूर जखमी

खरवंडी कासारनजीक टेम्पो उलटला; २६ मजूर जखमी

पाथर्डी :  तालुक्यातील खरवंडी कासार येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात तब्बल २६ मजूर जखमी झाले आहेत. त्यामध्ये लहान मुले, महिला व पुरुषांचा समावेश आहे. एका बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबई येथून परभणी जिल्ह्यातील पूरना गावी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात पाथर्डी येथील जिल्हा उप ग्रामीण रुग्णालयात १८ जणांवर उपचार सुरू आहेत. ८ जणांना अहमदनगर येथे हलवण्यात आहे. एक लहानग्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ.मनीषा खेडकर यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेच्या टेम्पोमधून छुप्या पद्धतीने प्रवासी वाहतूक करण्यात येत होती. पोलीस उपअधिकारी मंदार जावळे यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आहे. सर्वात खेदाची बाब म्हणजे जिल्हा उपरुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पोलिसानी अन्य भागातून रुग्णवाहिका मागवल्या होत्या.

Web Title: The tempo reversed near Kharwandi Kasar; 26 workers injured