टोमॅटो घेऊन जाणारा टेम्पो उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:21 IST2021-05-09T04:21:39+5:302021-05-09T04:21:39+5:30
विष्णू पांडुरंग उंबरे (वय ३५, रा. गोरडगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे या अपघातातील मृत टेम्पो चालकाचे नाव आहे. ...

टोमॅटो घेऊन जाणारा टेम्पो उलटला
विष्णू पांडुरंग उंबरे (वय ३५, रा. गोरडगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे या अपघातातील मृत टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे जिल्ह्यातील नारायणगावहून आयशर कंपनीचा टेम्पोमध्ये (एम.एच.१५,जी.व्ही.३१९८) टोमॅटो भरून नाशिककडे नेण्यात येत होता. हा टेम्पो अतिवेगात असल्याने चंदनापुरी घाटातील उतारावर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने तो दुभाजकाला धडकून उलटला. यात चालक बाहेर फेकला जाऊन टेम्पोखाली सापडून जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. क्रेन बोलावून टेम्पो बाजूला घेत चालकाला बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, वाहतूक खोळंबल्याने महामार्ग पोलिसांनी ती दुसऱ्या बाजूने वळविली. मृत चालकाचे नाव समजत नसल्याने अपघाग्रस्त टेम्पोचे मालक दत्तात्रय बाळासाहेब हरक यांचा संपर्क क्रमांक पोलिसांनी उपलब्ध केला. त्यांच्याशी संपर्क करत त्यांना अपघाताची माहिती देत चालकाच्या नावाची खात्री केली. टेम्पो चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवीत या अपघाताबाबत संगमनेर तालुका पोलिसांना कळविण्यात आले आहे.