नववर्षाच्या स्वागताला साईमंदिर रात्रभर खुले राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST2020-12-31T04:21:34+5:302020-12-31T04:21:34+5:30
३१ डिसेंबर रोजी वर्षअखेर व १ जानेवारी रोजी वर्षारंभ असल्याने देश-विदेशातील भाविक साईदरबारी हजेरी लावतात. या काळात असलेली गर्दी ...

नववर्षाच्या स्वागताला साईमंदिर रात्रभर खुले राहणार
३१ डिसेंबर रोजी वर्षअखेर व १ जानेवारी रोजी वर्षारंभ असल्याने देश-विदेशातील भाविक साईदरबारी हजेरी लावतात. या काळात असलेली गर्दी विचारात घेऊन ३१ डिसेंबर रोजी रात्री मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येते. यामुळे ३१ डिसेंबर रात्रीची शेजारती व १ जानेवारी पहाटेची काकड आरती करण्यात येत नाही. यंदा मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर संस्थान ३१ डिसेंबरबाबत काय निर्णय घेते, याकडे देशभरातील भाविकांचे लक्ष लागले होते. ३१ डिसेंबर रोजी मंदिर रात्रभर उघडे राहणार असले तरी रात्री बाराच्या ठोक्याला व तत्पूर्वी तासभर होणारी अनियंत्रित गर्दी विचारात घेऊन मध्यरात्रीपूर्वी ११.२५ ते ११.५५ पर्यंत मंदिरात दर्शन व्यवस्था स्वच्छतेच्या निमित्ताने बंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, तसेच गैरसोय टाळण्यासाठी दर्शन किंवा आरतीचे आगाऊ आरक्षण करून यावे, असे आवाहनही बगाटे यांनी केले आहे.