टाकळीभान येथील मंदिरासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:25+5:302021-07-12T04:14:25+5:30
टाकळीभान : येथील ग्रामदैवत व पुरातन महादेव मंदिराचा लोकवर्गणीतून विकास करण्याचा निर्णय यात्रा समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. ...

टाकळीभान येथील मंदिरासाठी
टाकळीभान : येथील ग्रामदैवत व पुरातन महादेव मंदिराचा लोकवर्गणीतून विकास करण्याचा निर्णय यात्रा समिती व ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
महादेव यात्रोत्सव कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षे रद्द करण्यात आला. त्यामुळे मंदिराचा विकास रखडला आहे. आता लोकवर्गणी काढून मंदिर व परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केल्याने बैठकीत एक लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली. हेमाडपंती मंदिराची डागडुजी, रंगरंगोटी, सांस्कृतिक व कीर्तन-भजन कार्यक्रमासाठी शेड, वृक्षलागवड, संरक्षक भिंत आदी विकासकामांवर चर्चा करण्यात आली. दानशूरांनी यात्रा समिती व उपसरपंच कान्हा खंडागळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच मंजाबापू थोरात, उपसरपंच कान्हा खंडागळे, राजेंद्र कोकणे, दत्तात्रय नाईक, भाऊसाहेब कोकणे, प्रा. बाळासाहेब लेलकर, मयूर पटारे, बाबा तनपुरे, बाबासाहेब बनकर, सुनील बोडखे, विशाल पटारे, मधुकर गायकवाड, शिवाजी पटारे, यशवंत रणनवरे, मोहन रणनवरे, महेंद्र संत उपस्थित होते.
-------