टेंभी खंडोबा मंदिराचे रूपडे पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST2021-07-31T04:22:22+5:302021-07-31T04:22:22+5:30

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील टेंभी खंडोबा मंदिराचे कळसाचा जीर्णोद्धार व प्रसादालयाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा वारकरी ...

Tembhi Khandoba temple will be transformed | टेंभी खंडोबा मंदिराचे रूपडे पालटणार

टेंभी खंडोबा मंदिराचे रूपडे पालटणार

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील टेंभी खंडोबा मंदिराचे कळसाचा जीर्णोद्धार व प्रसादालयाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा वारकरी सेवा संघाचे विश्वनाथ राऊत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यामुळे या मंदिराचे रूपडे पालटणार आहे.

यावेळी दत्तात्रय पवार यांनी एक लाख अकरा हजार रुपये या कामासाठी देणगी दिली. न्यूक्लियस हॉस्पिटलचे डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी स्वखर्चाने प्रसादालयाचे बांधकाम करून देण्याचे जाहीर केले. यावेळी धनगरवाडीचे सरपंच किशोर शिकारे, कृष्णा महाराज रायकर, पिंपळगाव माळवीचे ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड, सागर गुंड, मच्छिंद्र झिने, संदीप झिने, संजय प्रभुणे, पप्पू झिने, विश्वनाथ गुंड, पप्पू कदम, बबनराव वीरकर, सखाराम गवळी, विष्णू आढाव, बाबासाहेब शिकारे, सतीश विरकर आदी उपस्थित होते.

290721\1604img_20210729_121836.jpg

टेंभी खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धाराचे भूमिपूजन वारकरी सेवा संघाचे ह.भ.प विश्वनाथ राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Tembhi Khandoba temple will be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.