शिक्षक संघटनेच्या पत्राची तहसीलदारांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:57+5:302021-01-20T04:20:57+5:30

कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विलास शिंदे यांना १५ जानेवारीला मतदानाच्या दिवशी टाकळी येथील मतदान ...

Tehsildar took note of the letter of teachers union | शिक्षक संघटनेच्या पत्राची तहसीलदारांनी घेतली दखल

शिक्षक संघटनेच्या पत्राची तहसीलदारांनी घेतली दखल

कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विलास शिंदे यांना १५ जानेवारीला मतदानाच्या दिवशी टाकळी येथील मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी एक म्हणून कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना कोपरगाव शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

या उपचाराचा खर्च करण्याची त्यांची आर्थिक परस्थिती नसून, या उपचारादरम्यान येणारा सर्व आर्थिक खर्च हा तहसील कार्यालयामार्फत करण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण समिती गुरुकुल मंडळ जिल्हा संपर्कप्रमुख अशोक कानडे यांनी शनिवारी (दि. १६) तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांना दिले होते. त्याची तहसीलदार चंद्रे यांनी तत्काळ दखल घेत संबंधित शिक्षकाचा रुग्णालयातील खर्च कशा प्रकारे करता येईल, यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. तसा पत्रव्यवहारदेखील केला आहे, अशी माहिती अशोक कानडे यांनी दिली आहे.

Web Title: Tehsildar took note of the letter of teachers union