घुले पाटलांची शिकवण पिढ्यान्पिढ्या चालेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST2021-07-09T04:15:05+5:302021-07-09T04:15:05+5:30
दहिगावने : स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी, दलित समाजाची मुले-मुली शिकली पाहिजेत, या उद्देशाने जनता शिक्षण ...

घुले पाटलांची शिकवण पिढ्यान्पिढ्या चालेल
दहिगावने : स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी, दलित समाजाची मुले-मुली शिकली पाहिजेत, या उद्देशाने जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दारे उघडी झाली. शेतकऱ्यांच्या मदतीने सहकार क्षेत्रातील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची सुरुवात केली आणि परिसराला सुजलाम् सुफलाम् केले. शेवगाव-नेवासा तालुक्यात रचनात्मक ग्रामीण विकासाचा पाया घातला. स्वर्गीय घुले पाटलांची ही शिकवण पिढ्यान्पिढ्या पिढ्या चालेल, असे प्राचार्य अशोक उगलमुगले यांनी सांगितले.
शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संकुलात ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रामनाथ राठी होते.
यावेळी प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन, उपप्राचार्य उषा धुमाळ, सरपंच सुभाष पवार, सेवा संस्थेचे अध्यक्ष शब्बीर शेख, जहांगीर शेख, प्रा. काकासाहेब घुले, पर्यवेक्षक कणसे, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
देवराम सरोदे, बापूसाहेब लोढे, डॉ. शरद कोलते, के. वाय. नजन यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजेंद्र पानगव्हाणे यांनी केले. प्रा. मकरंद बारगुजे यांनी आभार मानले.
----
०८ दहिगावने घुले
दहिगावने येथे ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक स्व. मारुतरावजी घुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.