शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अशैक्षणिक कामाविरुद्ध शिक्षक धडकणार शिक्षण संचालक कार्यालयावर; २७ डिसेंबरला भव्य मोर्चा

By चंद्रकांत शेळके | Updated: December 21, 2023 01:31 IST

पुण्यातील मोर्चासाठी नगरमधून शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : विद्यार्थ्यांचे अध्यापन हे शिक्षकांचे मुख्य काम असताना शासनाने लादलेल्या विविध अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखालीच शिक्षक दबला आहे. त्यामुळे या अशैक्षणिक कामांविरोधात २७ डिसेंबर रोजी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयावर राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबन गाडेकर यांनी केले आहे.संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा हा भव्य मोर्चा निघणार असून, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे व राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात सहभागी व्हावे, असेही गाडेकर यांनी म्हटले आहे.

शिक्षकांवर नेहमीच अशैक्षणिक कामे सोपवली जातात. त्यात आता शासनाने नवभारत साक्षरता कार्यक्रमाची जबाबदारी शिक्षकांकडेच दिली आहे. निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करण्याची ही मोहीम २०२७ पर्यंत चालणार आहे. यावर राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने सुरुवातीपासूनच बहिष्कार टाकला आहे. असे असतानाही मागील आठ-दहा दिवसांपासून या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांवर सक्ती केली जात आहे. विनावेतन करू, वेतनवाढी रोखू, फौजदारी गुन्हे दाखल करू, अशा धमक्या शिक्षकांना दिल्या जात आहेत. या अन्यायकारक सक्तीविरुद्ध संघटना आक्रमक झाली असून, २७ डिसेंबर रोजी दुपारी एक ते चार या वेळेत शनिवार वाड्यापासून शिक्षण संचालक कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे, अशी माहिती राज्य संघाचे नेते दत्ता कुलट, राज्य संपर्कप्रमुख गोकुळ कळमकर, विभागीय अध्यक्ष राजेंद्र सदगीर, उच्च अधिकाराचे अध्यक्ष राजकुमार साळवे, अर्जुनराव शिरसाट, रवींद्र पिंपळे, भास्कर कराळे, गुरूमाउली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे, शिक्षक बँकेचे चेअरमन रामेश्वर चोपडे आदींनी दिली.

टॅग्स :agitationआंदोलनPuneपुणेAhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक