कोविडसाठी श्रीरामपुरातील शिक्षकांनी केली साडेतीन लाखांची वर्गणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:23 IST2021-05-10T18:22:25+5:302021-05-10T18:23:11+5:30

श्रीरामपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एका दिवसात ३ लाख ५० हजारांचा निधी कोरोना साहाय्यतेसाठी जमविला. त्यातून ७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करून ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका आरोग्य केंद्राला ते सुपूर्द केले.

Teachers from Shrirampur paid Rs 3.5 lakh for Kovid | कोविडसाठी श्रीरामपुरातील शिक्षकांनी केली साडेतीन लाखांची वर्गणी

कोविडसाठी श्रीरामपुरातील शिक्षकांनी केली साडेतीन लाखांची वर्गणी

श्रीरामपूर : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एका दिवसात ३ लाख ५० हजारांचा निधी कोरोना साहाय्यतेसाठी जमविला. त्यातून ७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करून ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका आरोग्य केंद्राला ते सुपूर्द केले.

तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयास पाच मशीन, तर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पालिका रुग्णालयाला दोन मशीन देण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, डॉ. संकेत मुंदडा, सचिन पऱ्हे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे, केतन खोरे, अल्तमेश पटेल उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड, डॉ. तौफिक शेख व डॉ. जयश्री वमने यांनी पाच मशीनचा स्वीकार केला.

कोरोना संकटामध्ये अनेक सेवाभावी संघटना व कार्यकर्ते पुढे येऊन काम करीत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मतभेद विसरून कोरोनाच्या मदतीसाठी संघटित काम करण्यासाठी एक समन्वय समिती गठीत करून ३ लाख ५० हजारांचा निधी जमा करणे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार पाटील व नगराध्यक्षा आदिक यांनी काढले.

Web Title: Teachers from Shrirampur paid Rs 3.5 lakh for Kovid