शिक्षक बँक निवडणुकीत संयम पाळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:31+5:302020-12-22T04:20:31+5:30
अहमदनगर : जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक लढवताना समाजाचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कलुषित होणार नाही, याची काळजी घ्या. निवडणूक लढविताना ...

शिक्षक बँक निवडणुकीत संयम पाळावा
अहमदनगर : जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक लढवताना समाजाचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कलुषित होणार नाही, याची काळजी घ्या. निवडणूक लढविताना प्रत्येकाने संयम पाळावा, असे आवाहन शिक्षकनेते व साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले.
श्रीगोंदा तालुका गुरुकुल व शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते रामदास भापकर होते. रा. या. औटी, संजय धामणे, नितिन काकडे, भास्कर नरसाळे, दशरथ देशमुख, उत्तम पवार, विजय महामुनी, मधुकर रसाळ, मिलिंद पोटे, भाऊसाहेब नगरे,राम ढवळे, अशोक घालमे, विजय जाधव आदी उपस्थित होते.
कळमकर म्हणाले, शिक्षक बँकेच्या निवडणुकीकडे समाजाचे बारीक लक्ष असते, याची जाणीव सर्वांनीच ठेवणे आवश्यक आहे. गुरुकुलने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याबरोबर विद्यार्थी व समाज घटकांसाठी विधायक उपक्रम राबवले. अभिमानाने सांगण्यासारख्या गुरुकुलकडे अनेक गोष्टी आहेत. इतरांचे दोष दाखवण्यापेक्षा गुरुकुलने राबविलेले विधायक उपक्रम सभासदांना सांगा. काही स्वयंभू शिक्षकनेते व बीनचेहऱ्याची मंडळे बँकेची सत्ता मिळवण्यासाठी उतावळे झाले आहेत. त्यांच्यापासून सावध रहा, असेही कळमकर म्हणाले.
मेळाव्यासाठी मिलिंद पोटे, दतात्रय शिंदे, शिवाजी रायकर, सुभाष यादव, प्रवीण गांगार्डे, अंकुश बेलोटे, बाळासाहेब अनपट, शुभांगी ईश्वरे, रावसाहेब दरेकर, महादेव खेतमाळस, जावेद सय्यद, दिलीप रसकर, संतोष शिंदे, बिभिशन हराळ, सुरेंद्र हातवळणे, सुरेश हराळ, दादासाहेब चोभे, संगीता भापकर, संगीता पवार, कैलास ठाणगे, लक्ष्मण शेंडगे आदींनी परिश्रम घेतले.
..............
२१ संजय कळमकर
जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका शोभा कोकाटे यांचा गुरुकुलच्यावतीने सत्कार करताना संजय कळमकर, रामदास भापकर, रा. या. औटी, संजय धामणे, नितिन काकडे आदी.