शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर घटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:29 IST2021-02-26T04:29:14+5:302021-02-26T04:29:14+5:30

अहमदनगर : जिल्हा शिक्षक बँकेचे सभासद तसेच गुरूमाउली मंडळाच्या तालुकाध्यक्षांनी व्याजदर कमी करण्याची मागणी केली होती. बुधवारी झालेल्या सहविचार ...

Teachers reduced interest rates on bank loans | शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर घटवला

शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर घटवला

अहमदनगर : जिल्हा शिक्षक बँकेचे सभासद तसेच गुरूमाउली मंडळाच्या तालुकाध्यक्षांनी व्याजदर कमी करण्याची मागणी केली होती. बुधवारी झालेल्या सहविचार सभेत सभासदांचा ही मागणी मान्य करीत १६ मार्चपासून बँकेचे व्याजदर घटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजू राहणे यांनी दिली.

येत्या १६ मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, बँकेने जामीन कर्जावरील व्याजदर ०.४० टक्के कमी करून ९ .९० वरून ९.५० टक्के केला आहे. तसेच शैक्षणिक कर्ज, गृहबांधणी-गृहखरेदी, गृहतारण व वाहनखरेदी या सर्व कर्जावरील व्याजदर ९ टक्के केला आहे. बुधवारी शिक्षक बँकेत आर. टी. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली. या सभेत हा निर्णय घेतल्याचे राहणे म्हणाले. यावेळी जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, माजी अध्यक्ष गोकुळ कळमकर, किसन वराट, बाळासाहेब सरोदे, संदीप मोटे, नारायण पिसे, मच्छिंद्र लोखंडे, विठ्ठलराव फुंदे, बाळासाहेब तापकीर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्युल्लता आढाव, महिला आघाडी उत्तर जिल्हाप्रमुख अंजली मुळे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्तापाटील कुलट, मोहनराव पागिरे, बाळासाहेब चाबुकस्वार, माजी अध्यक्ष संतोष दुसंगे, साहेबराव अनाप, शरद सुद्रिक, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मुखेकर, उषाताई बनकर, संचालक सलीमखान पठाण, किसनराव खेमनर, गंगाराम गोडे, बाबा खरात, अर्जुन शिरसाट, सुयोग पवार, अनिल भवार, उत्तर जिल्हाप्रमुख राजकुमार साळवे, भाऊराव राहिंज, पी. डी. सोनवणे, आबा दळवी, राम वाकचौरे, रामेश्वर चोपडे, प्रदीप राहाणे, कैलास निकम, संतोष मगर आदी उपस्थित होते.

..............

बँकेने ओलांडला साडेअकराशे कोटींचा टप्पा

निर्णयाचे जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी स्वागत केले असून, गेल्या अनेक वर्षांपासून इतक्या कमी मार्जिनमध्ये बँक चालवण्याचा विक्रम या संचालक मंडळाने केला आहे. गुरुमाउली मंडळ सत्तेवर आल्यापासून कर्जाचा व्याज दर सातत्याने कमी केला आहे. सत्तेवर येऊन कर्ज दर न वाढवता व्याजदर कमी करणारे विद्यमान संचालक मंडळ एकमेव आहे. या मंडळाच्या नेतृत्वाखाली कायम ठेवीवर सातत्याने वाढता व्याजदर मिळालेला असून, लाभांश वाढताच दिला आहे. संचालकांच्या विश्वासावरच बँकेने साडेअकराशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे, असे बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.

Web Title: Teachers reduced interest rates on bank loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.