शिक्षकांचा ऑफलाईन तर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:29+5:302021-06-22T04:15:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या शिक्षकांनी ऑफलाईन तर विद्यार्थ्यांनी ...

शिक्षकांचा ऑफलाईन तर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन योग दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या शिक्षकांनी ऑफलाईन तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला.शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांनी शाळेच्या प्रांगणात सकाळच्या प्रसन्न वातावरणात योग, प्राणायाम केले. याचवेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने योग दिनाचे प्रात्यक्षिक दाखविले. विद्यार्थ्यांनीही आपले शिक्षक योग करतात हे पाहून घरीच उत्साहात योगासने केली. यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक संपतराव गाडेकर, एम. एम. बनकर, सतीश झांबरे यांनी योगासन प्रात्यक्षिक दाखविले. संजया नितनवरे यांनी प्रार्थना वाचली. क्रीडाशिक्षक संदीप घावटे यांनी योगासनांची माहिती देत महत्त्व सांगितले. अमोल कातोरे यांनी विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रात्यक्षिक पोहोचविले.
210621\img_20210621_093359.jpg
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या शिक्षकांनी जागतिक योगदिन साजरा केला . ( छायाचित्र - संदीप घावटे )