सावित्रीबाई महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:21 IST2021-09-13T04:21:13+5:302021-09-13T04:21:13+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी एज्युकेशन सोसायटीचे सावित्रीबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा ...

Teacher's Day celebrated at Savitribai College | सावित्रीबाई महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

सावित्रीबाई महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी एज्युकेशन सोसायटीचे सावित्रीबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विश्वस्त डॉ. प्रणोती जगताप उपस्थित होत्या. जगताप म्हणाल्या, विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षकच करत असतात. आपल्या शैक्षणिक जीवनात खऱ्या अर्थाने शिक्षकच आपले आयुष्य घडवत असतात. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. ढगे होते. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. एस. आय. घेगडे यांनी केले. यावेळी सृष्टी गायकवाड, पूनम शहाणे, प्रीती भापकर, अंजली शहा, रोहित जगताप, प्रवीण तोंडे या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे समाजात असणारे महत्त्व आपल्या मनोगतात सांगितले. विद्यार्थी रोहित कांबळे याने सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. डी. शितोळे यांनी आभार मानले.

Web Title: Teacher's Day celebrated at Savitribai College