शिक्षक बँक प्रचाराची आज सांगता

By Admin | Updated: February 26, 2016 23:42 IST2016-02-26T23:30:04+5:302016-02-26T23:42:14+5:30

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून शनिवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे.

The teacher today announced the campaign | शिक्षक बँक प्रचाराची आज सांगता

शिक्षक बँक प्रचाराची आज सांगता

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून शनिवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी सदिच्छा मंडळाने पत्रकार परिषद घेत, गुरुमाउली नातेवाईकांचे मंडळ असून गुरुकुल मंडळाचा चेहरा बनावट असल्याचा आरोप केला आहे. कोअर बँकिंग प्रकरणाची क्लीप बनावट असल्याचा दावा केला आहे. सदिच्छाच्यावतीने राजेंद्र शिंदे आणि अनिल आंधळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
यावेळी शिंदे म्हणाले, निवडणूक सुरू होण्यापूर्वी वेगळ्या पद्धतीने विरोधकांचा प्रचार सुरू होता. मात्र, सदिच्छाने अतिशय संयमाने निवडणूक हाताळली. पाच वर्षात केलेला कारभार सभासदांसमोर आहे. चुकीचा कारभार केला असता, तर ठेवी वाढल्या असत्या का? कर्जावर सर्वांत कमी व्याजदर देता आला असता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोअर बँकिंग संदर्भात सभासदांमध्ये एक क्लिप फिरत आहे़ ही व्हिडिओ क्लिप बनावट आहे. तीन वर्षापूर्वी हा विषय सुरू झाला. तीन चेअरमनपदाच्या काळात हा विषय मार्गी लागला आहे. बँकेला कोअर बँकिंगची गरज नाही. मात्र, आरबीआयमुळे कोअर बँकिंग करावी लागली. ज्याने ही व्हिडिओ क्लिप काढली, त्याने ती पूर्ण दाखवलेली नाही. अर्धवट क्लिप दाखवून दिशाभूल सुरू आहे. १६ तारखेनंतर महाआघाडीत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बँक व विकास मंडळातील पाच अपक्ष निवडणूक सोडून महाआघाडीत सहभागी झाले आहेत. चांगले काम केल्याने पाच घटक पक्ष आमच्या सोबत आले, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आंधळे यांनी गुरुकुल मंडळाचे नेते संजय कळमकर यांच्यावर थेट आरोप केले. आत्महत्याग्रस्त शेतकरी मदत निधी, शिक्षकांचे अधिवेशन, मेडिकार्ड योजनेत मोठा आर्थिक घोटाळा आहे. आपण माफीचे साक्षीदार म्हणून हे सांगत आहोत. महाबळेश्वर अधिवेशनाचे जमा केलेले पैसे राज्याला न भरल्याने नगर जिल्ह्याला एकही पद मिळालेले नाही. कळमकर आणि रा. या. औटी यांचे पद बनावट आहे. स्वत:चे दुकान चालवण्यासाठी कळमकरांनी गुरुकुल मंडळ आणि कार्यकर्त्यांचा वापर केला. गुरुकुलच्या पक्षीय निधीबाबत होत असणाराआरोप चुकीचा असून मी कधीही हिशोबाला बसण्यास तयार आहे. गुरुकुलमध्ये उमेदवारी विकल्याचा संशय आहे. यावेळी महाआघडीचे नेते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: The teacher today announced the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.