शिक्षक बँकेने कुटुंब आधारची रक्कम तत्काळ अदा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:19+5:302021-07-25T04:19:19+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांना बसली आहे. जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षक बँकेच्या ५६ ...

शिक्षक बँकेने कुटुंब आधारची रक्कम तत्काळ अदा करावी
अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांना बसली आहे. जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षक बँकेच्या ५६ सभासदांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षक बँकेने कुटुंब आधार योजनेचा लाभ तत्काळ दिला जावा, अशी मागणी रोहोकलेप्रणीत गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे यांनी केली.
डावखरे म्हणाले, कोरोनामुळे एकीकडे कुटुंबातील कर्ती व्यक्ती गमावल्याच्या दु:खाबरोबरच दवाखान्यातील उपचाराच्या मोठ्या खर्चामुळे या कुटुंबांचे आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे. प्राथमिक शिक्षकांना नेहमीच आर्थिक मदत करणाऱ्या आणि शिक्षकांची कामधेनू असणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेने शिक्षक सभासदाचा मृत्यू झाल्यास मयतनिधीतून संबंधित सभासदाचे सर्व कर्ज निवारण करून त्याच मयतनिधीतून अधिकची ५ लाखांची मदत व कुटुंबआधारमधून १० लाखांची मदत अशी एकूण १५ लाखांची मदत मृत सभासदांच्या कुटुंबाला तकाळ उपलब्ध करून देऊन या कुटुंबांना आधार द्यावा, अन्यथा संबंधित कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आम्ही बँकेसमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा डावखरे यांनी दिला आहे.