टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:13 IST2021-02-19T04:13:25+5:302021-02-19T04:13:25+5:30

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा भार अरुणा प्रदीप खिलारी यांनी तर उपसरपंचपदाचा भार ...

Takli Dhokeshwar Gram Panchayat office bearers accepted the post | टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा भार अरुणा प्रदीप खिलारी यांनी तर उपसरपंचपदाचा भार सुनील हरिभाऊ चव्हाण यांनी स्वीकारला. आमदार नीलेश लंके यांनी दोघांचाही सत्कार केला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ता निवडुंगे, रामदास तराळ, शुभम गोरडे, गंगाधर निवडुंगे, सुनीता झावरे, प्रियांका बांडे, सुग्राबी हवालदार, बबनराव पायमोडे, गतिमंद शाळेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब झावरे, आदर्शगाव योजनेचे माजी अध्यक्ष महेश पाटील, बाळासाहेब खिलारी, सुनील गोरडे, रामभाऊ तराळ, सोमनाथ बांडे, कादर हवलदार, जयसिंग झावरे, ग्रामविकास अधिकारी मोहिनी तरवडे आदी उपस्थित होते.

बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया यांनी आभार मानले.

----

टाकळीत चांगले उपक्रम राबविणार

सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी दूर करणार असून, धुमाळ वस्तीवरील तलावाचा मार्ग मोकळा करून देणार आहे. गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून, विकासकामांना नेहमीच झुकते माप राहील.

नीलेश लंके,

आमदार, पारनेर-नगर

फोटो ओळी १८ टाकळी ढोकेश्वर

टाकळी ढोकेश्वर येथील सरपंच, उपसरपंचांनी पदभार स्वीकारला.

Web Title: Takli Dhokeshwar Gram Panchayat office bearers accepted the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.