शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महाजनादेश यात्रा अहमदनगरमध्ये पोहोचताच मुख्यमंत्री विखे पाटलांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 14:51 IST

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महाजनादेश यात्रेचे आगमन नगर जिल्ह्यात सोमवारी झाले आहे.

लोणी : प्रवरा परिसराच्या राजकीय, सामाजिक वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या श्रीमती स्व.सिंधुताई विखे पाटील यांना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी लोणी येथे सोमवारी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर फडणवीस यांनी विखे पाटील परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांचे १८ ऑगस्ट रोजी निधन झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विखे पाटील परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यासाठी सोमवारी सकाळी शिर्डी विमानतळावर आगमन झाले. 

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महाजनादेश यात्रेचे आगमन नगर जिल्ह्यात सोमवारी झाले आहे. पाथर्डी येथे जाहीर सभेस रवाना होण्यापूर्वी लोणी येथे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. लोणी येथील आपल्या १५ मिनिटांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी विखे पाटील परिवारातील सर्व सदस्यांशी संवाद साधून या दु:खद घटनेतून सावरण्याचा दिलासा दिला. श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांनी ग्रामीण भागात महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती करुन घेतली. याप्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर कदम, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, काशिनाथ विखे, डॉ.अशोक विखे, डॉ.राजेंद्र विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, खासदार डॉ.सुजय विखे, सुवर्णा विखे, धनश्री विखे, ध्रुव राजेंद्र विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

अनेक मान्यवरांनी केले सांत्वनमागील दहा दिवसाच्या काळात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विखे पाटील परिवाराचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या आहेत. यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जेष्ठ नेते आ.गणपतराव देशमुख, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, बबनराव लोणीकर, योगेशजी सागर, मधुकर पिचड, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, शोभा बच्छाव, अशोक पाटील, आ.अब्दुल सत्तार, आ.पृथ्वीराज देशमुख, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.विश्वजित कदम, आ.मंगलप्रभात लोढा, रणजितसिंह मोहिते, रामगिरीजी महाराज, रामराव ढोक महाराज, निवृत्ती महाराज देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, डॉ.एम.जी.ताकवले, राजाराम देशमुख, रजनीताई पाटील, दिलीप गांधी, राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी शेखर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश पाटील, भगवंतराव मोरे यांच्यासह आजी, माजी आमदार, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकाºयांचा समावेश होता.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीAhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील