महावितरण महाकृषी ऊर्जा धोरणाचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:02+5:302021-03-15T04:20:02+5:30
महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत कृषी ऊर्जापर्व १ मार्च २०२१ ते १४ एप्रिल २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. ...

महावितरण महाकृषी ऊर्जा धोरणाचा लाभ घ्या
महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत कृषी ऊर्जापर्व १ मार्च २०२१ ते १४ एप्रिल २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत माहितीपुस्तिकेचे व पोस्टरचे विमोचन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे व महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे उपस्थित होते.
यासोबतच महाकृषी ऊर्जा अभियान - कृषीऊर्जा पर्व या प्रचारपुस्तिकेचे व भित्तीपत्रकाचे अनावरण अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते शेवगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आले. यावेळी शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, महावितरण शेवगावचे उपकार्यकारी अभियंता श्रीशैल्य लोहारे, सहाय्यक अभियंता सुशील तायडे, सहाय्यक लेखापाल सुरेश जायभाये उपस्थित होते
१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान महावितरणचे कृषी ऊर्जापर्व राज्यभर राबविण्यात येत असून कृषी पर्वाच्या माध्यमातून १८ कलमी कार्यक्रमाद्वारे महाकृषी अभियानाची जनजागृती करण्यात येत आहे. थकबाकीदार ग्राहकांना सवलत असणारे महावितरणचे कृषी धोरण शेतकऱ्यांची थकबाकी शून्य करणारे तर आहेच, शिवाय वसूल झालेल्या थकबाकीतून ग्रामीण वीज जाळे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
फोटो - राजेंद्र भोसले
महाकृषी ऊर्जा अभियान माहितीपुस्तिकेचे विमोचन करताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाने, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे.