कृषी सेवकाच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST2021-06-05T04:16:00+5:302021-06-05T04:16:00+5:30
संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बाचकर यांनी कृषी उपसंचालक विलास नलगे यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रोहोकले, सोसायटीचे ...

कृषी सेवकाच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा
संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बाचकर यांनी कृषी उपसंचालक विलास नलगे यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रोहोकले, सोसायटीचे चेअरमन तुळशीराम पवार आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, कृषी सहायक व सेवकांवर सद्यपरिस्थितीत मोठ्या प्रमाणात कामाचा ताण येत आहे. वरिष्ठांकडून कामाबाबत अत्यंत हीन वागणूक दिली जात आहे. अशाच प्रकरणातून हिंगे यांनी आत्महत्या केली. हिंगे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
..................
फोटो-०४ निवेदन
ओळी-कृषी सहायकाच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने कृषी उपसंचालक विलास नलगे यांना देताना संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बाचकर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रोहोकले, सोसायटीचे चेअरमन तुळशीराम पवार.