घनकचरा व्यवस्थापनच्या ठेकेदारावर कारवाई करा
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:27+5:302020-12-05T04:37:27+5:30
नेवासा : शहरातील रस्त्यावरील कचऱ्यामुळे रोगराईत वाढ होत असून नगर पंचायतीमार्फत घनकचरा व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार निदर्शनास येत आहे. घनकचरा ...

घनकचरा व्यवस्थापनच्या ठेकेदारावर कारवाई करा
नेवासा : शहरातील रस्त्यावरील कचऱ्यामुळे रोगराईत वाढ होत असून नगर पंचायतीमार्फत घनकचरा व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार निदर्शनास येत आहे. घनकचरा व्यवस्थापन ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी येथील जाकीर शेख, इम्रान दारूवाले यांच्यासह नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत कार्यालयीन अधीक्षक गुप्ता यांना निवेदनात देण्यात आले. नगर पंचायतीला शासनाने घनकचरा ठेकेदार नियुक्त केलेल्या आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडून पडलेले दिसत आहे. काही एक दोन प्रभाग सोडले तर बाकीच्या प्रभागात कचरा संकलन करणारी घंटागाडी ही चार ते पाच दिवसांनी घरातील कचरा घेण्यासाठी येत आहे. त्यामुळे घराघरातील कचरा घरातच साचल्याने तसेच नेवासा शहराच्या मुख्य बाजारपेठमधील रस्त्यावरही कचरा झालेला निदर्शनास येत आहे.
एक तर कोरोनाची साथ त्यातच कचरा न उचलल्याने होणाऱ्या घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे. त्यामुळे ठेकेदाराला तत्पर सेवा देण्यासंदर्भात नगर पंचायत ठेकेदाराला योग्य ती समज द्यावी. पूर्वीप्रमाणेच कचरा संकलन होण्यासाठी आदेश द्यावेत, अन्यथा त्या ठेकेदारावर योग्य कारवाई करण्यात यावी. त्याचे बिल अदा करू नये. नगर पंचायतीने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा शहरातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर इम्रान दारूवाले, जाकीर शेख, नितीन मिरपगार, इम्रान पटेल, मुन्ना आतार, अब्बास बागवान, महेश पंडुरे, नवाब बागवान, असीर पठाण, राजेंद्र पोतदार, रियाज पठाण, गोरख घुले, असीफ इनामदार, सोहेल सय्यद, नदीम चौधरी, उमेर शेख, जैद शेख, अरबाज शेख, अजीज पठाण, अमीन शेख, शरीफ पठाण, सचिन पवार, अन्सार बागवान, अफ्फान आतार, राजेंद्र कडू यांच्या सह्या आहेत.
फोटो : ०३ नेवासा निवेदन
नेवासा येथील कचरा संकलनाबाबत निवेदन नगर पंचायतीला दिले.